Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो हल्लीच आमच्या शाळेची सहल गेली होती आणि आम्हाला एका प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले होते. त्या प्राणीसंग्रहालय मध्ये खूप सुंदर प्राणी होते आणि तिथे आम्हाला फार काही प्राण्यांविषयी शिकायला मिळाले. आणि आज आम्ही प्राणी संग्रहालय या विषयावर मराठी निबंध आणला आहे.

This is image of giraph used for Marathi essay on zoo

प्राणी संग्रहालय.

आमच्या शाळेमध्ये वर्षातून एकदा विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जातात, जेने की विद्यार्थ्यांना नवीन जागा बघायला मिळेल त्यांचे मनोरंजन देखील होईल आणि त्यांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. या वर्षी आमच्या शाळेने आम्हाला प्राणीसंग्रहालयात फिरायला नेण्याचा निर्णय घेतला, आम्ही सगळे विद्यार्थी प्राणिसंग्रहालयात असलेल्या प्राण्यांना बघण्यासाठी खूप उत्साहित होते.

मग शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी आम्ही प्राणिसंग्रहालयात जाण्यासाठी निघाले. आम्ही सगळे स्कूल बस मध्ये बसलो आणि निघालो प्राण्यांना भेटायला. सर्व मुलांमध्ये खूप उत्साह होता कारण माझ्यासारखे दुसरे मुलेही प्राण्यांना पहिल्यांदा बघणार होते, बस मध्ये सगळे प्राण्यांविषयीच बोलत होते.

आमची बस प्राणिसंग्रहालया जवळ पोचली, सर्व मुले एकत्र झाले आणि आणि संग्रहालया विषयी माहिती देण्यासाठी तिथे एक "गाईड" होते. त्यांनी आम्हाला मध्ये जाण्याआधी काही माहिती दिली त्यांनी सांगितले होते की कोणीही कुठल्याही प्राण्याला काही खायला देणार नाही आणि कुठल्याच प्राण्याला कोणीही कुठल्याही प्रकारे सतावणार नाही. गाईड ने दिलेल्या सूचनान नंतर आमचे प्राणिसंग्रहालयाची सहल सुरू झाली.

प्रवेशद्वारावरा वरती खूपच सुंदर प्राण्यांच्या मुर्त्या बनवले गेले होते तिथे मोगली कार्टून चे दृश्य बनवले गेले होते यामध्ये मोगली, कुफा आणि काही प्राणी होते त्याच्यावरती "वेलकम टू द झू" असे लिहिले गेले होते. बाहेरचे इतके सुंदर दृश्य पाहून आम्ही मधल्या प्राण्यांना बघण्यासाठी अजूनही उत्साहीत झाले होते.

मध्ये खूप मोठ-मोठे पिंजरे बनवले गेले होते जिथे प्राण्यांसाठी फिरण्यासाठी खूप मोकळी जागा होती मध्ये एकदम जंगला सारखे वातावरण बनवले गेले होते. तिथे प्राण्यांची पूर्ण काळजी घेतली जात असे त्यांना खाण्याची आणि पाण्याची काहीही कमी नव्हती. आम्हाला गाईडने सांगितले की प्राण्यांच्या देखभालीसाठी डॉक्टर नेहमी इथे हजर असतात.

आम्ही तिथे माकड बघितले, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे माकडे होते त्यांमधून लांगुर नावाचे माकड खूप सुंदर दिसत होते. काही माकड इथून तिथून उड्या मारत होती, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज चढून जात होती. आम्ही तिथे एक मोठा गोरिला देखील बघितला त्याला बघून खूप घाबरी वाटत होती पण तो स्वभावाने शांत दिसत होता. एका बाजूला जिराफ होता जो आपली उंच मान घेऊन झाडांची पाने खात होता. दुसरीकडे हरीण पाणी पीत होते ते खुपच सतर्क असतात थोडाही आवाज किंवा हलचल होताच लगेच खूप वेगाने पळून जातात.

प्राणिसंग्रहालयात खूप प्राणी होते पण तिथे सर्वात जास्त लोक वाघ आणि सिंह बघण्यासाठी जात होते. पण वाघ आणि सिंह पिंजऱ्यामध्ये झोपून राहिले होते त्यांना लोकांची काहीही ही फिकीर नव्हती. आम्ही सिंग वाला गेंडा सुद्धा बघितला त्याला बघून घब्री वाटत होती असे वाटते की तो पिंजरा तोडून बाहेर येईल कारण त्याचे शरीर खूप मोठे होते आणि तो खूप ताकतवर दिसत होता. त्यानंतर आम्ही एक पान गेंडा बघितला तो पाण्यामध्ये एक मोठ्या म्हशीसारखा दिसत होता पण जेव्हा त्यांनी त्याचे तोंड उघडले तर आम्ही त्याच्याकडे बघतच राहिले. आम्ही मोठ्या दाताचे हत्ती देखील बघितले ते खूप मोठे होते.

प्राणी संग्रहालयामध्ये एक एक्वेरियम सुद्धा बनवले गेले होते तिथे वेगवेगळे प्रकारचे मासे आणि काही कासव होते. प्राणी संग्रहालय मध्ये आम्ही खूप सारे प्राणी बघितले आणि त्यांच्याबद्दल खूप काही नवीन माहिती मिळवली. ज्या उत्साहाने आम्ही प्राणिसंग्रहालयात आले होते त्याच उत्साहाने आम्ही प्राणिसंग्रहालयाची सहल पूर्ण केली.

समाप्त।

मित्रांनो तुम्ही पाणी संग्रहालयाला भेट दिली आहे का आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा.

प्राणी संग्रहालय वरती हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९वी आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • मी बघितलेला प्राणी संग्रहालय.
  • प्राणी संग्रहालयाला भेट.
  • संग्रहालयाची सहल
  • मी बघितलेले झू.
  • मित्रांनो तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आणि जर तुम्हाला कोणत्या इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा.

    धन्यवाद।

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या