प्रयत्नान्ती परमेश्वर - कष्टाचे फळ मराठी निबंध.

तुम्हालाया जगात पाहिजे ते मिळते पण ते मिळवण्या साठी तुम्हाला कष्ट करावे लागतात, तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला परमेश्वर सुद्धा मिळेल म्हणूनच तर सांगतात कष्टाचे फळ नेहमी गोड असते व प्रयत्नान्ती परमेश्वर. तर आज मराठी निबंध कष्टा चे फळ हा मराठी निबंध घेऊन आला आहे तो तुम्ही नक्की वाचा.

This image show a man working hard and builts a house and this image is been used for marathi nibandh on kashtache phal

प्रयत्नान्ती परमेश्वर

प्रयत्नांती परमेश्वर ! म्हणजेच प्रयत्न हाच परमेश्वर असतो, असा ह्या म्हणीचा अर्थ आहे. कारण प्रयत्नाने कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते म्हणून वरील विधान सत्य आहे. याची सत्यता पटवणारी अनेक उधारने आहेत. फ्रेंच सेनापती नेपोलियन बोनापार्ट हा एक साधा शिपाई होता त्याने आपल्या प्रयत्नाच्या बळावर अजिंक्यपद प्राप्त केले. ह्याच्या मते तर जगात अशक्य असे काही नाही, मात्र ते शक्य करून घेण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत.

असाध्य साध्य, करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे || मात्र इच्छीत हेतू साध्य करून घेण्यासाठी खूप कष्ट केले पाहिजेत असे संत शिरोमणी तुकाराम महाराज देखील सांगतात "देरे हरी पलंगावरी" अशी इच्छा करीत बसणार्याला कधीच काही साध्य होणार नाही. म्हणून मनुष्याने सतत कष्ट करून इच्छीत फळ प्राप्त करून घेतले पाहिजे.

आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य दीडशे वर्ष होते इंग्रजी जोखांडाच्या गुलामगिरीत आपण खिचपत पडलो होतो. पण सारी जनता एकवटली आणि स्वातंत्र प्राप्ती करून घेण्याचे प्रयत्न सुरु झाले, सत्याग्रह, असरकार-परदेशी मालावर बहिष्कार अश्या अनेक चळवली सुरु झाल्या या सर्व प्रयत्नांच्या जोरावर शेवटी स्वराज्याची प्राप्ती झाली.

अलीकडे तर सुधारलेल्या देशात कृमित्र उपग्रह करून चंद्रावर सोडण्याची जणू स्पर्धा सुरु झाली आहे त्याच्या या प्रयत्नात त्यांना अनेक अपयशही पत्कारावे लागले. पण त्यात त्यांनी उमेद सोडली नाही. उलट जिद्दीने प्रयत्नास लागले, परिणाम एक दिवस त्यांचे अवकाशाने, चंद्राचा वेध घेऊन परत सुखरूप पणे पृथ्वीवर आले. हे सर्व प्रयत्नांचे फळ आहे.

याचप्रमाणे वीर शेरपा तेरसिंग गौरीशिखरावर चढला. तो अनेकदा पडला पण त्यांनी उमेद सोडली नाही त्याने प्रयत्ने केले आणि त्याचे फळ त्याला मिळाले हाच परमेश्वर होय.

म्हणून प्रतेकाने आप आपल्या कामात खूप-खूप कष्ट करून श्रेष्ठत्वाला जाण्याचा सतत प्रयत्न करावा ! आणि असे केले तर यशोशिखर मिळतोच. म्हणून तर म्हटले आहे कि, "प्रयत्न कण रगडीत वाळूचे तेलही गळे".

समाप्त

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला प्रयत्नान्ती परमेश्वर हा मराठी निबंध आम्हाला खाली comment करून सांगा. तसेच हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

हा मराठी निबंध खालील दिलेल्या विषयावर सुद्धा वापरू शकतात.

  • कष्टाचे फळ नेहमी गोड.
  • मेहनतीचे फळ.
  • प्रयत्न कण रगडीत वाळूचे तेलही गळे.

तर मित्रांनो आपल्यांना इतर कोणत्या हि विषया वर मराठी निबंध हवा असेल तर खाली comment करून सांगा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या