Social Media essay in Marathi | सोशल मीडिया वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. प्रत्येक लोक सोशल मीडियाचा वापर आपल्या गरजे अनुसार करतात. आजच्या ह्या सोशल मीडिया च्या युगा मध्ये आम्ही सोशल मीडिया वर मराठी निबंध घेऊन आले आहेत. ह्या निबंधा मध्ये आम्ही सोशल मीडिया चे विविध प्रकार आणि त्यांनी होणारे फायदे व नुकसान अर्थात त्याचे लाभ व हानी ह्याचे वर्णन केले आहे.

image of a girl using social media facebook instagram and twiter useed for marathi essay on social media

सोशल मीडिया.

आजच्या ह्या जगात सर्वी लोक आप आपल्या कामा मध्ये वस्त असतात कोणाला ही दुसऱ्यां साठी वेळ मिळत नाही. लोकांवर कामाचा इतका तान असतो की त्यांना आपल्या स्वतच्या कुटुंबातील लोकांना भेटायला सुधा वेळ नसतो. आणि ह्या समस्या चे समाधान म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही कोन्हाशी ही संपर्क साधू शकतात ते ही काही शनातच आणि आपल्या जाग्यात बसल्या बसल्या.

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याने लोक एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडली जातात. सोशल मीडियाचे विविध प्रकार आहेत, जसे की व्हॉट्सऍप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि बरेचसे इतर. या विविध प्रकारच्या सोशल मीडियांचा वापर करून लोकं एक दुसऱ्याबरोबर संवाद साधू शकतात व आपली कला आपल्या भावना जगासमोर व्यक्त करू शकतात तेही आपल्या जागेत बसल्याबसल्या.

सोशल मीडिया आपल्या जगण्याची पद्धत बदलत आहे, इथे प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. सोशल मीडिया आपल्यासाठी नक्कीच एक वरदान आहे आणि यामध्ये जगाला बदलण्याची शक्ती आहे. सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे आणि त्यांचे खूप फायदे आहेत पण त्याचे काही नुकसान देखील आहेत. सोशल मीडिया चे फायदे व नुकसान पाहून आपण नक्कीच ठरऊ शकतो की हा सोशल मीडिया आपल्यासाठी शाप आहे की वरदान.

सोशल मीडिया चे फायदे बागता खूप लोकांसाठी सोशल मीडिया नक्कीच एक वरदानच्या स्वरूपात बागतात. कारण त्याच्या सहाय्याने कोणताही व्यक्ती जगातील कोणत्याही व्यक्तीशी घर बसल्या संवाद साधू शकतो तसेच ह्यावर व्हिडिओ कॉल ची सुद्धा सुविधा आहे. सोशल मीडियावर आपण खूप सारे नवीन मित्र बनवू शकतो. जर तुमच्याकडे कुठलीही कला असेल तर ती कला तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवू शकतात.

सोशल मीडियाची ताकद वापरून गव्हर्मेंट लोकांना जागृत करू शकते कारण सोशल मीडिया चा वापर प्रत्येक नागरिक करू शकतो. विद्यार्थी सोशल मीडियावर त्यांना आवड असणार विषयावर संपूर्ण माहिती मोफत मिळवू शकतात.

सोशल मीडिया चे अमर्याद लाभ आहेत पण तरीही काही लोकांना वाटते की सोशल मीडिया आपल्यासाठी एक शाप आहे, कारण त्याचे काही नुकसान देखील आहेत. सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की लोक आता संवाद साधण्यासाठी एक दुसऱ्याला भेटत नाही. तसेच सोशल मीडियावर बनवल्या जाणाऱ्या मित्रांकडून फसवणूक केली जाऊ शकते.

खूप लोक आपली कला सोशल मीडियाच्या माध्यमातून सादर करतात पण त्यांना टिकेला सामोरे जावे लागते. टीकेमुळे होणाऱ्या मानसिक ताणामुळे खूप लोक डिप्रेशनचा शिकार होतात. सोशल मीडियावर अफवा पसरवणे खूप सोपे आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवले जाऊ शकते. मुलं आपला महत्वपूर्ण वेळ सोशल मीडियावर वाया घालवतात आणि आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करता. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि ते त्यांचे भविष धोक्यात टाकतात.

जसे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसेच सोशल मीडिया चे फायदे व नुकसान आहेत. सोशल मीडिया हे एक शस्त्र प्रमाणे आहे, आता त्याचा वापर आपण कसा करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे.

समाप्त.

मित्रांनो तुम्ही कोणत्या सोशल मीडियाचा वापर करतात? आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा.

सोशल मीडियावर हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि 10वी मुलं आपल्या अभ्यासासाठी करू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • सोशल मीडिया शाप की वरदान.
  • सोशल मीडिया चे फायदे व नुकसान.

मित्रांनो तुम्हाला हा मराठी निबंध आवडला का? आणि जर तुम्हाला इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध पाहिजे असेल तर आम्हाला खाली कमेंट नक्की करून सांगा.

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या