कॉम्प्युटर आज आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग बनला आहे, असे बोलणे चुकीचे ठरणार नाही. कम्प्युटर मुळे सगळी कामे किती लवकर आणि अचूक होतात, आम्ही आज कम्प्युटर ह्या विषयावर मराठी निबंध आणला आहे. चला निबंधाला सुरुवात करुया.
कॉम्प्युटर.
कॉम्प्युटर आज आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग बनला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात कम्प्युटरचा वापर केला जातो. जगातील सर्वात प्रथम कॉम्प्युटर चा उपोयोग "चार्ल्स बैबज" ह्यांनी १९४६ मधे केला होता, ते कम्प्युटर चे आविष्कारक आहेत. चार्ल्स बैबज ह्यांना "फादर ऑफ कम्प्युटर" ही उपाधी दिली गेली आहे.
जेव्हा पहीला कम्प्युटर बनवला गेला होता तेव्हा तो आकाराने खूप मोठा होता, आणि तेव्हा कम्प्युटर प्रत्येकाच्या घरात ठेवणे शक्य नव्हते. पण वेळेबरोबर कॉम्प्युटर मध्ये फारसे बदल करण्यात आले आणि आज कॉम्प्युटर आकाराने छोटे झाले आहेत, आणि त्याबरोबरच आता ते खूप ऍडव्हान्स झाले आहेत.आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा वापर केला जातो. म्हणून सांगितले जाते कि आजचे युग हे कॉम्प्युटरचे युग आहे.
कम्प्युटरच्या मदतीने कुठलेही काम अगदी जलद करता येते आणि कॉम्प्युटरने केलेले काम अचूक असते. म्हणून कम्प्युटरने प्रत्येक कार्यालयामध्ये आपली जागा बनवली आहे. कम्प्युटर हा आपल्या जीवनाचा महत्वपूर्ण भाग झाला आहे.
संगणकाने मानवी जीवन एकदम सोपे करून टाकले आहे, पण कॉम्प्युटरचे फायदे आणि नुकसान देखील आहेत. कॉम्प्युटरचा वापर आपण कसा करून घेतो हे महत्त्वाचे असते कारण मनुष्य सारखे कॉम्प्युटरला चांगले वाईट ह्यामधला फरक कळत नाही, तो केवळ त्याला दिलेल्या सूचना अनुसार चालतो.
कम्प्युटरच्या सहाय्याने आज विद्यार्थी शालेय शिक्षण घरी बसल्या मिळवू शकतो. आज कॉम्प्युटर कोणी पण कुठेही घेऊन जाऊ शकते त्यामुळे कामे आपल्या वेळेनुसार करता येतात. आज सर्व डेटा एका छोट्या कॉम्प्युटर मध्ये ठेवला जाऊ शकतो त्यामुळे पूर्वीच्या फाइल्स पासून सुटका झाली आहे. कॉम्प्युटर मध्ये काही शोधायला वेल खुप लागत नाही बटन दाबले की सर्वकाही जागेत बसून डोळ्यासमोर येते. आज तिकीट काढणे, लाईट बिल भरणे आणि अशी कितीतरी कामे किती जलद होतात, हे सर्व कॉम्प्युटर मुळेच शक्य झाले आहे.
कॉम्प्युटरचे फायदे तर भरपूर आहेत पण त्याचे काही नुकसान सुद्धा आहेत. संगणकामुळे आज सर्व कामे सोपी झाली आहेत पण त्यामुळे माणसे आळशी होत चालली आहेत, मनुष्य आता कॉम्प्युटर वर अवलंबून राहू लागला आहे. आज कॉम्प्युटर ने सर्वकाही ऑटोमॅटिक झाल्याने कंपनीमध्ये माणसे नव्हे तर रोबोट काम करतात ज्याने लोकांना आता काम मिळत नाही. विद्यार्थी आपला पूर्ण वेळ कम्प्युटर गेम खेळत वाया घालवतात. काही वाईट वृत्तीची लोक कॉम्प्युटर वायरस बनवतात ज्याने ते कॉम्प्युटर मधला महत्वपूर्ण डेटा चोरी करतात ज्याने खूप नुकसान होते. कम्प्युटरचा वापर केल्याने डोळ्याचा आणि कमरेचा त्रास होतो.
असा हा कॉम्प्युटर एक बहुपयोगी तंत्र आहे पण त्याचे केवळ फायदे नसून नुकसान देखील आहे. आपण कम्प्युटर चा योग्य वापर केला पाहिजे पण त्यावर पूर्णपणे अवलंबून नाही राहिले पाहिजे.
समाप्त.
तर मित्रांनो तुमच्याकडे कम्प्युटर आहे का? आणि तुम्ही त्याचा कसा उपयोग करतात आम्हाला खाली comment करून सांगा.
कॉम्प्युटरवर हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
- कॉम्प्युटरचे फायदे व नुकसान.
- कम्प्युटरचे युग.
- कॉम्प्युटरचे फायदे.
- कॉम्प्युटरने होणारे नुकसान.
- जीवनात कॉम्प्युटर चे महत्व.
- संगणक.
मित्रांनो आपल्यांना हा मराठी निबंध कसा वाटला तसेच जर आपल्याला इतर कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करुन सांगा.
धन्यवाद.
0 टिप्पण्या