नमस्कार मित्रांनो पाऊस पडला नाही तर, ही किती विचित्र कल्पना आहे ना. आज Marathi Nibandh आपल्यासाठी पाऊस पडला नाही तर या विषयावर मराठी निबंध घेऊन आला आहे. चला ह्या मराठी निबंधाला सुरुवात करुया.
पाऊस पडला नाही तर.
खूप पाऊस पडत होता आणि मी सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार झाला होता.घरी नेहमीप्रमाणे सकाळच्या बातम्या सुरु होत्या आणि तेव्हा माहित पडले जास्त पाऊस पडल्याने आणि सगळीकडे पाणी भरल्याने सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
मी अगदी आनंदाने नाचू लागले, पण टीव्हीवर नंतर पाऊस पडल्याने काय नुकसान झाले आहे ते बघितले. पावसाने केलेली नासाडी बघून मी थक्क झालो. आणि माझ्या मनात कल्पना आली की पाऊस पडला नाही तर किती बरे होईल ना.
पाऊस पडला नाही तर लोकांना पावसाच्या पाण्याने त्रास होणार नाही, पाणी साचून कोणाचेही काही नुकसान होणार नाही आणि लोक आनंदाने राहतील. पण नंतर माझ्या मनात दुसरा विचार आला.
पाऊस नसेल तर आपल्याला पाणी कसे मिळेल.जर पाऊस पडला नाही तर तळे आणि नद्या राहणारच नाही. पावसाचे पाणी नाही तर नद्या आणि तलावांमध्ये राहणारे जीव जगू शकणार नाही.
आपल्या आजूबाजूला सुंदर हिरवेगार निसर्ग आपण बघतो, पण जर पाऊस नसला तर झाडे जी आपल्याला हवा, खायला फळ आणि सावली देतात ते राहणारच नाही. पावसाच्या पाण्याविना सर्व झाडे सुकून जातील आणि सर्व झाडे मरून जातील. जे सुंदर निसर्ग आपण बघतो ते केवळ एक वाळवंट स्वरूप दगड धोंड्यांचे प्रदेश बनून जाईल.
आपल्याला पाऊस पडला नाही तर पावसाने मातीला येणारा सुगंध मिळणार नाही, पहिल्या पावसात भिजण्याची मजा घेता येणार नाही, इंद्रधनुष्य बघायला मिळणार नाही. पावसाळा आला नाही तर पावसात होणाऱ्या छत्रीचा कावळा बघता येणार नाही.
जर पाऊस पडला नाही तर आपल्याला खायला काहीही मिळणार नाही कारण पावसा विना शेती शक्य नाही. जर का पाऊस पडला नाही तर या पृथ्वीवर जीवन शक्य नाही कारण आपल्यांना प्यायला पाणीसुद्धा मिळणार नाही.
पाऊस पडल्याने नुकसान होते हे खरे आहे पण त्यामध्ये आपली सुद्धा चूक आहे कारण सगळीकडे सिमेंटीकरण केल्याने जमिनीला पाणी शोषता येत नाही. आणि शहरांमध्ये पावसाच्या पाण्याला नीट वाहता येत नाही आणि म्हणून पावसामुळे आपले नुकसान होते. पाऊस आहे तर जीवन आहे, म्हणून पाऊस हा पडलाच पाहिजे.
समाप्त.
जर पाऊस पडला नाही तर काय होईल, तुम्हाला काय वाटते आम्हाला खाली comment करून तुमचे विचार सांगा.
हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच पाऊस पडला नाही तर हा काल्पनिक निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
- पाऊस नसता तर.
- जर पाऊस आला नाही तर.
- पावसाळा नसता तर.
- पावसाळा का नकोसा वाटतो.
मित्रांनो तुम्हाला हा काल्पनिक मराठी निबंध कसा वाटला आणि जर तुम्हाला इतर मराठी विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करुन सांगा.
धन्यवाद.
19 टिप्पण्या
शाळा उघडल्या नाही तर हा निबंध पाहिजे आहे
उत्तर द्याहटवाहो लवकरच आम्ही हा निबंध घेऊन येऊ
हटवाOk
हटवाThank You :)
हटवाKhupach chan
उत्तर द्याहटवाThank you :)
हटवाyour imagination is very well
हटवाThank you :)
हटवाVery nice!
उत्तर द्याहटवाThank You :)
हटवापावसा मुळे निसर्गाची शोभा वाढते. पावसाळ्यात सजीवांना जीवनदान मिळते मातीला सुगंध येतो
उत्तर द्याहटवाहो नक्कीच हे वातावरण पाऊसाचे मला सुद्धा खूप आवडते.
हटवाNo,..(Yes)
हटवा?
हटवाAll
हटवाWhat ?
हटवापावसाची वाट पाहणारा प्रसंग. आणि ती भावना अनुभव ली आहे मी. खुप छान प्रसंग आहे तो.
हटवाNice essay
उत्तर द्याहटवाThank you very much :)
हटवा