दसरा मराठी निबंध | Marathi essay on Dusara.

नमस्कार मित्रांनो दसरा हा एक प्रसिद्ध हिंदू सण आहे, तो भारतामध्ये खूप उत्साहाने बनवला जातो. आज आम्ही दसरा ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आले आहेत. तर चला निबंध सुरू करूया.

दसरा.

भारतामध्ये वर्षभर खूप सारे सण साजरे केले जातात आणि तसाच एक लोकप्रिय सण म्हणजे दसरा. दसरा हा भारतामध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो. दसऱ्याच्या ह्या उत्सवाला विजयादशमी असे ही म्हटले जाते.

दसरा का आणि कसा सुरू झाला यावर खूप गोष्टी प्रचलित आहेत, आणि भारतामध्ये विजयादशमी ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केली जाते. सगळे लोक दसऱ्याच्या दिवसाला खूप पवित्र आणि शुभ मानतात.

या पवित्र दिवशी लोक आपल्या सर्व महत्त्वाच्या वस्तू जसे की अवजारे, हिशोबाच्या वह्या आणि इतर महत्त्वपूर्ण वस्तूंची पूजा करतात. ह्या सणाला शेतकरी ही खूप प्रसन्न असतात कारण ह्या सणाच्या वेळेस शेतात धान्य पूर्णपणे तयार होते.

दसरा हा सण पूर्ण भारतात खूप उत्साहाने बनवला जातो,हा सण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो कारण हा सण कसा सुरू झाला ह्यावर वेगवेगळ्या गोष्टी प्रचलित आहेत.

जेव्हा दुर्गा माता ने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता तो दिवस दशमी होता, म्हणजेच नवरात्रीच्या नंतरचा दिवसम, हा दिवस दहावा दिवस असल्यामुळे ह्या सणाला दसरा असे म्हटले जाते. या दिवशी दुर्गा माता नी राक्षस महिषासुर याचा वध केला होता म्हणून लोक दसऱ्याच्या दिवसाला पवित्र मानतात. या दिवशी दुर्गामातेची पूजा अर्चना केले जाते आणि रिती अनुसार तिचे विसर्जन केले जाते.

दुसरे कारण ज्यामुळे दसऱ्याला इतके पवित्र मानले जाते ते म्हणजे या दिवशी श्री राम यांनी अत्याचारी आणि दृष्ट रावणाचा वध केला होता आणि सीता मातेला रावणापासून वाचवले होते. म्हणून या दिवशी भारतामध्ये रावणाचे पुतळे बनवून जाळले जातात.

दसरा पूर्ण भारतामध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो आणि हा एक खूप पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी दुष्ट वृत्तीचा नाश दुर्गा माता आणि श्री राम यांनी केला होता. दसऱ्याच्या निमित्त काही ठिकाणी रामलीला आयोजित केली जाते, ती खुपच रोमांचिक असते. अशाप्रकारे दसऱ्याचा हा सण साजरा केला जातो.

समाप्त.

मित्रांनो तुम्ही दुसरा कसा साजरा करतात आणि तुमच्या कडे दुसऱ्या निमित्त काय केले जाते आम्हाला खाली comment करुन सांगा.

दसरा हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयावर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • विजयादशमी.
  • माझा आवडता सण - दसरा.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला आणि जर आपल्याला कोणत्याही इतर मराठी विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करुन सांगा.

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या