नमस्कार मित्रांनो आज आम्ही सरदार वल्लभभाई पटेल ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आले आहोत. सरदार वल्लभाई पटेल या मराठी निबंध मध्ये आम्ही वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याचे वर्णन केले आहे, आणि कसे त्यांना सरदार ही उपाधी मिळाली ह्याचे वर्णन केले आहे. चला मित्रांनो निबंधाला सुरुवात करूया.
सरदार वल्लभाई पटेल.
सरदार वल्लभभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक वरिष्ठ नेता होते आणि भारतीय गणराज्य स्थापन करणाऱ्या मधून एक होते. वल्लभभाई झावेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोंबर १८७५ मदे नाडियाद, गुजरात मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई आणि आईचे नाव लाढबाई होते.
वल्लभभाई पटेल यांचे वडील झावेरभाई हे एक शेतकरी होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामध्ये झाशी च्या राणी च्या सेनेमध्ये कार्य केले होते. सरदार पटेल ने आपले सुरुवातीचे शिक्षण आपल्या स्थानिक शाळेमधून आपल्या वडिलांबरोबर शेतीचे काम करत पूर्ण केले होते. सरदार पटेल लहानपणापासूनच एक बुद्धिमान, सहाशी आणि दृढ संकल्प ठेवणारे माणूस होते. ते नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असे. ह्याच गुणांमुळे त्यांना वकील बनायचे होते.
पैशांची कमी असूनही सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या मित्रांकडून पुस्तके मागून वकिलीचा अभ्यास केला आणि जिल्हा वकिलीची परीक्षा ते पास झाले. त्यांनी गोधरा, गुजरात मध्ये आपली वकिली करायला सुरुवात केली. १९०२ मध्ये ते वलसाड येथे आले आणि जिल्हा मुख्यालय मध्ये यशस्वीपणे आठ वर्ष गुन्हेगारीवर वकिली केली जेणेकरून त्यांनी आपल्या परिवाराला आर्थिक रुपाने स्थिर केले.
पैशांची कमी दूर केल्यानंतर त्यांनी झवेरबा यांच्याशी लग्न केले, त्यांना दोन मुले होती. सन १९१० मध्ये उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी ते लंडनला गेले आणि तिथे परीक्षांमध्ये प्रथम आले. मग ते भारतात परतल्यावर अहमदाबाद येथे वकिली करू लागले.
जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल १९१७ मध्ये महात्मा गांधीजींना भेटले तेव्हा त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले जेव्हा त्यांनी गांधीजींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न आणि अहिंसा चे तत्त्वज्ञान बघितले. सन १९१८ मध्ये गुजरातच्या खेडा येथे भयंकर दुष्काळ पडला होता. म्हणून शेतकऱ्यांनी इंग्रज सरकारला कर माफी करण्याचे निवेदन केले पण इंग्रज सरकारने ते नकारले. तेव्हा सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर नाही देण्यास सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमोर इंग्रज सरकारला माघार घ्यायला लागली आणि कर माफ करावा लागला, हे सरदार पटेल चे पहिले मोठे यश होते.
बार्डोली सत्याग्रह च्या निमित्ताने सन १९२८ मध्ये गुजरात मध्ये एक प्रमुख किसान आंदोलन झाले होते, ज्याचे नेतृत्व स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. या आंदोलनापुढे इंग्रज सरकारला माघार घ्यायला पडला होता आणि सरदार पटेल मुळे शेतकऱ्यांचा विजय झाला होता. या सत्याग्रहाच्या यशानंतर लोकांनी वल्लभाई पटेल यांना "सरदार" ही उपाधी दिली होती, ज्याचा अर्थ आपला मुख्य किंवा आपला राजा असा होतो. तेव्हापासून त्यांना सरदार वल्लभाई पटेल या नावाने ओळखले जाऊ लागले.
सरदार वल्लभभाई पटेल ने खूप सारे इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलने केली. १९४२ मध्ये महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलन मध्ये सरदार पटेल ने आपले पूर्ण सहकार्य केले होते. त्यांना याच कारणामुळे तुरुंगामध्ये सुद्धा झाला लागले होते.
स्वातंत्र्याच्या आधी भारता ५८४ राज्यांमध्ये वाटला गेला होता. सरदार पटेल ने या राज्यांना एकत्रित आणल्यावर ती जोर दिला होता आणि सर्व राज्यांना इंग्रज सरकार विरुद्ध होण्यास सांगितले होते. ते पूर्ण देशाला एक करण्याच्या प्रयत्नांमध्ये होते. त्यांना Iron Man of India "पोलादी पुरुष" ही उपाधी दिली होती कारण भारतात चे राज्य आपण आज बघतो ते आज सरदार पटेल मुळेच आहेत.
१९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे ते पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री बनले. त्यांनी IAS आणि IPS ची स्थापना करण्यामध्ये सहाय्य केले होते म्हणून त्यांना भारतीय सेवेचा संरक्षक संत असेही सांगितले जाते. १५ डिसेंबर १९५० मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी दहा लाखापेक्षा जास्त लोक आले होते. त्यांना त्यांच्या कार्यामुळे "भारतरत्न" हा पुरस्कार देण्यात आला होता. भारतात खूप सारे महाविद्यालय आणि संस्था त्यांच्या नावाने उघडण्यात आल्या आहेत. गुजरात मध्ये सरदार सरोवर बांध आहे, जो नर्मदा नदीवर स्थित आहे तिथे सरदार पटेल यांचा विश्वा मध्ये सर्वात उंच पुतळा बांधण्यात आला आहे, "स्टॅच्यू ऑफ युनिटी" या नावाने तो प्रसिद्ध आहे. सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्मदिवस "राष्ट्रीय एकता दिवस" ह्या रूपाने साजरा केला जातो.
समाप्त।
मित्रांनो तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा बघितला आहे का ? आणि तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बद्दल काय वाटते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा.
सरदार वल्लभभाई पटेल वर हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९वी आणि १०वि ची मुलं आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला आणि जर तुम्हाला कोणत्या इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद।
0 टिप्पण्या