आज मराठी निबंध एका वेगळ्या विषयावर निबंध घेऊन आला आहे तो म्हणजे "लष्करी शिक्षण", तर चला मित्रांनो निबंधाला सुरवात करू या.
लष्करी शिक्षण.
आपला भारत देश हा एक स्वतंत्र देश आहे. आपल्यांना इतर देशांवर हल्ला करायचा नाही. परंतु आपल्या स्वातंत्राचे रक्षण करायला हवे. आपल्या स्वातंत्रा चे रक्षण करणे हे आपले सर्वात महत्वाचे कार्य आहे, त्या दृष्टी ने सध्याचे काळ खूपच धोक्याचे आहे.
सीमा प्रश्नांवरून पाकिस्तानात हालचाली सुरु आहेत हिमाचल प्रदेशवरून चीनशी वादावादी चालू आहे. रशिया अमेरिका यात केव्हा तिसरे महायुद्ध सुरु होईल याचा नेम नाही. अशा परिस्थितीत भारतावर केव्हा हल्ला होईल सांगता येत नाही. या आक्रमणाचा प्रतिकार करण्याची आपली तयारी असली पाहिजे.
आधुनिक युगात या युद्धशस्त्रात अतिशय प्रगती झाली आहे. अटोमिकबॉम, हेड्रोजन बॉम, ब्रम्हास्त्र यासारखी अनेक नवीन साधने आपल्या देशाला नवीनच आहेत. या सर्व गोष्टींची ओळख आपल्या नागरिकांना करून द्याला हवी. त्यांचा या यांत्रिक सामक्रीशी परिचय झालातर धेर्य निर्माण होईल आणि वेळोप्रसंगी आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी आपण त्याचा उपयोग करू शकू.
प्रत्यक स्वतंत्र राष्ट्राला आपले सैन्य ठेवावेच लागते. हे सैने दोन प्रकारचे असते. पहिला प्रकार म्हणजे कायमचे सैन्य हे पगारी सैन्य असते, लढाई असो व नसो या सैन्याला सरकार ला पोसावेच लागते परंतु आक्रमान झाल्यास असे हे सैन्य पुरे पडत नाही.
यावेळी तात्पुरते प्रासंगिक लष्कर उभारावे लागते यासाठी प्रत्येक राष्ट्राने आपले प्रासंगिक लष्करहि तयार ठेवावे लागते. देशातील तरुणांना लष्करी शिक्षनाची ओळख करून द्यावी लागते त्या करिता होमगार्ड सारख्या संघटना सरकार उभारते.
या प्रासंगिक सैन्यासाठी सरकारला शाळा कॉलेजांतील विध्यार्थीनचा उपोग करून घेता येईल. त्याकरिता शाळा कॉलेजातील मोठ्या विद्यार्थ्यांना लष्करी शिक्षणही द्यावे लागेल तशी व्यवस्था शाळेय अभ्यासक्रमांकात केली पाहिजे. अश्या प्रकारचे काही प्रयोग लहान प्रमाणावर आजच्या सरकारचे चालू आहेत.
बहुसंख्य कॉलेजात एन.सी.सी आणि शाळेत ए.सी.सी संघटना चालू आहेत. विध्यार्धी आणि विध्यार्थीनिंना लष्करी शिक्षण दिले जाते. पण त्याची कोणाला हि सक्ती नाही पण अश्या प्रकारे होणारी तयारी हि फार अपुरी आहे.
याकरिता सरकारने आता सर्व शाळेत आणि कॉलेजमध्ये या लष्करी शिक्षणाची सक्ती तरुणांना केली पाहिजे, त्यावर काही लोक टीका करतील कि, आधीच विध्यार्थीनवर शैक्षणिक विषयांचा बोजा वाढला आहे, त्यात हि भर का ? परंतु या लष्करी शिक्षणाची आवशकता सर्वांना पटवून दिली पाहिजे. विध्यार्थीनचा जो इतर वेळ निरर्थक गोष्टीत जातो त्याचा या कामाकरिता उपयोग केला पाहिजे. विद्यार्थिना मिळनाऱ्या मोठ्या सुट्टीत जर त्यांना युद्धकलेची तांत्रिक आणि प्राथमिक माहिती दिली तर, जरुरीच्या वेळी कायम लष्कराला सहकार्य देण्याचे काम या संघटनातून तयार झालेले सैनेक करू शकतील.
विद्यार्थी जीवनातया लष्करी शिक्षणाचे इतर अनेक फायदे होतील. मुख्यत व्यायाम करण्याची सवय लागेल ज्यामुळे त्यांची प्रकृती सुधरेल. या संघटना काम करतांना एकमेकांना सहकार्य करण्याची त्यांना सवय लागेल. त्यांच्या देंनदीन जीवनात सक्ती, चिकाटी, कष्टाळूपना इत्यादी गुण येतील आणि ते यांना भावी जीवनात उपयोगी पडतील.
जय हिंद.
तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते मुलांना लष्करी शिक्षण दिले पाहिजे कि नाही ? आम्हाला खाली comment करून सांगा. तसेच हा निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुळे आपल्या अभ्यास साठी वापरू शकतात.
तुम्हाला जर एका जवानाचे मनोगत हा निबंध हवा असेल तर इथे click करा.
धन्यवाद. तसेच जर तुम्हाला इतर कुठल्याही विषयावर मराठी निबंध हवा असेल आम्हाला खाली comment करून सांगा.
0 टिप्पण्या