गणेश उत्सव मराठी निबंध | Essay on Ganesh Chaturthi in Marathi.

आपण भारतीय वर्षभर किती सारे सण / उत्सव साजरा करतो नाही का. त्या मधला सर्वांना आवडणार सण म्हणजे गणेश चतुर्थी ज्याला आपण गणेश उत्सव म्हणतो. आज आम्ही साजरा केलेला गणेश उत्सव हा मराठी निबंध आपल्या साठी आणला आहे. तर चाल निबंधाला सुरवात करूया.

This image has a ganesh idol which is been used for marathi essay on ganesh chaturthi

गणेश उत्सव.

भारता मधे वर्षभर खूप उत्साहाने सण साजरे केली जातात मग तो दही हंडी असो दिवाळी असो किंव्हा होळी असो कि गणेश उत्सव असो. पण प्रत्येकाला एक न एक सण खूप प्रिय असतो, जसा मला गणेश उत्सव आहे.

गणेश चतुर्थी ज्याला विनायक चतुर्थी हि म्हंटल जाते त्या दिवसाला गणेश उत्सव या स्वरूपाने साजरा केले जाते. गणेश उत्सव सार्वजनिक पने साजरा करण्याची पद्त बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक ह्यांनी किली होती. असे गणेश चतुर्थी सार्वजनिक पद्तीने करण्या मागे टिळकांचा हेतू होता कि सर्व लोकांनी ह्या सणा निमित्त कोणते हि मतभेत न ठेवता एकत्र यावे आणि सण साजरा करावा जेणे करून लोकांन मधे एकी राहील.

गणेश उत्सव हा दहा ते अकरा दिवसांचा असतो पण त्याचा उत्साह तर महिना भर आदिच सुरु होतो कारण आपले विग्नहरता गणेश सर्वांचे लाढके आहेत. विनायक चतुर्थीच्या एक दिवस आधीच बापांची मूर्ती आणली जाते त्यांना आणतांना खूप वाजत गाजत आणतात. सर्वांन मधे खूप उत्साहचे वातावरण असते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी मुहूर्ता अनुसार गणपतीची पूजा अर्चना करून मूर्ती ची स्थापना करतात. गणेश चतुर्थी निमित्त शाळेला २-३ दिवसांची सुट्टी मिळते, घरी स्वादिष्ट असे मोदक बनवले जातात कारण मोदक गणपती बापांना खूप आवडतात आणि आम्हा मुलांना सुद्धा.

आमच्या गावात आमचे एक छोटे गणेश मंडळ आहे गणेश उत्सवा निमित्त आमचे मंडळ काही कार्यक्रम आयोजित करते. आमच्या इथे ५ दिवसांचा सार्वजनिक गणपती असतो त्याचे डेकोरेशन मदे सुंदर असे चल चित्र बनवले जाते जे काही न काही सामाजिक संदेश देते. तसेच रात्री एक-एक दिवस वेग-वेगळे स्पर्धा आयोजित केल्या जातात कधी वकृत्व स्पर्धा कधी नृत्य, नाटक तर एक दिवस खेळ, गणपतीच्या शेवटच्या दिवशी सर्व विजेत्यांना बक्षीस दिले जातात.

आम्ही गणपतीला आमच्या सार्वजनिक जागेवर स्तापित करतो सर्व गावकरी खूप उत्साहाने सर्वी कामे करतात, सर्व काही गावातली मुलच तयार करतात. गणपतीला रात्रभर आम्ही जगतो आणि खूप मज्या मस्ती करतो. मग तो दिवस येतो जेव्हा सर्वांचे चेहरे खाली पडतात चेहऱ्या वर नाराजी येते कारण आता बापांच्या विसर्जनाचा वेळ आला असतो.

गणपती ची मिरवणूक काढली जाते, त्यांची गाडी मस्त सजवली जाते, वाजत-गाजत गणपतीचे विसर्जन होते सर्वांचे चेहर्यावर आनंद असतो पण मनात दुख कारण बापा आता पुढच्या वर्षी येणार म्हणून तर म्हणतात "गणपती चाले गावाला, चेन पडे ना आम्हाला. गणपती बापा पुढच्या वर्षी लवकर या" असा हा गणेश उत्सव उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतो.

समाप्त.

मित्रांनो तुम्ही गणेश उत्सव कसा साजरा करतात, आणि तुमच्या गणपती मंडळाचे नाव काय आम्हाला खाली comment करून सांगा.

तसेच गणेश उत्सव हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयानवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • आम्ही साजरा केलेला गणेश उत्सव.
  • माझा आवडता सण - गणेश उत्सव.
  • गणेश चतुर्थी | गणेशोत्सव.
  • विनायक चतुर्थी.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला तसेच तुम्हला जर इतर कोणत्या हि विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खली comment करून सांगा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

16 टिप्पण्या

  1. आमच्या मंडळाचा नाव आहे " लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ" LRVA ❤️🚩

    उत्तर द्याहटवा