नमस्कार मित्रांनो मला लॉटरी लागली तर ह्या मराठी निबंधा मध्ये आम्ही मला लॉटरी लागली तर मी त्या पैशाचे काय करेन ह्याचे वर्णन केले आहे तर चला मित्रांनो निबंधाची सुरुवात करूया.
मला लॉटरी लागली तर.
माझ्या एका मित्राने एक महागडा मोबाईल घेतला होता, तो मोबाईल मला खूप आवडला होता मला ही तसाच मोबाईल फोन घेण्याची इच्छा झाली होती पण इतका महागडा फोन मला घेणे शक्य नव्हते.
दुसऱ्या दिवशी मी शाळेत जाण्यासाठी निघालो आणि बस स्थानकावर बस ची वाट पाहू लागलो तेव्हा माझी नजर तिथे असलेल्या एका लॉटरीच्या दुकानावर पडली काही लोक तिथे लॉटरी खरेदी करत होते दुकानावर मोठा बोर्ड लागला होता ज्यावर एक करोड रुपयांची बंपर लॉटरी ची जाहिरात होती.
माझ्या मनात विचार आला की मला लॉटरी लागली तर किती बरे होईल!. मला एक करोड रुपये लागले तर मी काय करेन असा विचार मी करू लागला. मला पाहिजे ते मी सर्वकाही इतक्या पैशात घेऊ शकतो. माझ्या मनातील सर्व इच्छा मी पूर्ण करू शकतो माझा मित्रा पेक्षा जास्त चांगला आणि महागडा मोबाईल मी घेऊ शकतो.
लॉटरी पाहून माझ्या मनात पैशांचा गोंधळ उडू लागला होता मी अजून लॉटरी घेतली ही नव्हती तरीही फक्त जाहिरात पाहून मी लॉटरीच्या इतका मोहात पडला होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला मला लॉटरी लागली तर माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील पण. लॉटरी खेळणे हा जुगार तर नाही ना ? आणि लॉटरीवर अवलंबून राहणे योग्य आहे का?.
आपण ऐकले असेल लॉटरी हा नशिबाचा खेळ आहे, पण खरेतर असे नाही लॉटरी हा एक जुगारच आहे. कारण एक लॉटरी जिंकण्यासाठी कित्येक लोक पैसे लावतात आणि त्या लोकांमधून एकाला लॉटरी लागते. बाकीच्यांचे पैसे व्यर्थ जातात. आणि एकदा लॉटरी लागली तर आपल्याला ती परत परत खेळण्याची वाईट सवय लागते म्हणजे प्रत्येक वेळेस पैशांची नासाडी.
लॉटरीचे हे असे गणित माझ्या मनात येतात आणि लॉटरी नशिबाचा खेळ नसून तो एक जुगार आहे हे कळताच मला लॉटरी लागली तर, मी काय करेल याचा विचार करण्यापेक्षा मी माझ्या कष्टाने आणि माझ्या मेहनतीने चांगले शिक्षण घेऊन माझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन. नाय पाहिजे मला ती लॉटरी असा ठाम निश्चय मी केला, आणि "मला लॉटरी लागली तर.." हा विचार सोडून दिला.
समाप्त।
मित्रांनो तुम्हाला लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल, तुम्ही तुमची कोणती इच्छा पूर्ण कराल आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा.
मला लॉटरी लागली तर हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९वी आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
मित्रांनो तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आणि जर तुम्हाला इतर कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली कमेंट करुन सांगा.
धन्यवाद।
0 टिप्पण्या