नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्यासाठी मी पाहिलेली जत्रा ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आला आहे. या निबंधामध्ये आम्ही मी बघितलेल्या यात्रेचे वर्णन केले आहे.
मी पाहिलेली जत्रा.
मी शहरात राहतो आणि आतुरतेने वाट पहात असतो, ती म्हणजे कधी एकदा शाळेला सुट्टी मिळते कारण सुट्टी मिळताच मी निघतो माझ्या गावा कडे. मला आमच्या गावांमध्ये राहायला खूप आवडते.
आमच्या गावात माता महालक्ष्मी चे मोठे मंदिर आहे आणि त्याचा खूप जुना इतिहास आहे मंदिराच्या भोवती खूप मोकळी जागा आहे आणि तिथे खूप मोठी जत्रा भरते आणि मी दरवर्षी या जत्रेला गावात येतो कारण मला जत्रा खूप आवडते.
मंदिरात साफसफाई सुरू होते संपूर्ण जागा स्वच्छ केली जाते आणि गावात हळू-हळू लीकांची गर्दी होऊ लागते. मंदिर सजवले जाते रात्रीच्या अंधारात ते खूपच सुंदर दिसते, मंदिर परिसरात आकाश पाळणे आणि तशेच वेगवेगल्या प्रकारचे पाळणे लावले जातात, खाण्या-पिण्याच्या दुकाने लावली जातात मंदिराचे पूर्ण परिसर बदलून जाते. लोकांनमदे खूप उत्साह असतो मग देवीची पालखी निघते आणि सुरुवात होते ती म्हणजे जत्रेला.
गावात जत्रेसाठी लोकांची गर्दी होऊ लागते शहरातून माझ्यासारखे लोक गावात परत येऊ लागतात आणि लोक खूप उत्साहित असतात. जत्रा गच्च भरलेली असते. मी माझ्या गावातील मित्रांबरोबर जत्रेत फिरायला रात्रीच्यावेळी जातो. रात्री जत्रेत फिरण्याची एक वेगळीच मजा असते. मला वेगवेगळ्या पाळण्यात बसायला खूप आवडते कारण पाळण्यात बसून आकाशात उडायचा अनुभव येतो. इतक्या उंचावरून आमचे संपूर्ण गाव दिसते ते खूप सुंदर दिसते. माझ्या एका मित्राला आकाश पाळण्यात बसायला खूप भीती वाटते पण तरीही आम्ही त्याला आमच्या जोडीला आकाश पाळण्यात बसवतात तो इतका घाबरतो की पाळण्याला खूप घट्ट धरून बसतो आणि डोळे बंद करून राहतो.
पाळण्या मध्ये मजा केल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या खेळांची मजा घेतो. मला बंदूक ने शूटींग करायला खूप आवडते जो नेम घेऊन फुगे फोडतो त्याला बक्षीस मिळते, तसेच एक रिंग चा खेळ असतो ज्यामध्ये एक रिंग वस्तूवर टाकली जाते जर रिंग बरोबर त्या वस्तूवर पडली तर ती वस्तू आपल्याला मिळते.
जत्रेमध्ये खूप सारे खेळण्यांची, कपड्यांचे दुकाने असतात. तर काही दुकाने अशी असतात जिथे आपल्या कलेने लोकांना आकर्षित केले जाते. जत्रेत खूप सारे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची दुकाने असतात तसेच आइस्क्रीमचे ही दुकान असते. मला आईस्क्रीम खायला खूप आवडते.
जत्रेतून काही खाऊन मित्रांबरोबर फिरून आणि पाळण्यात बसून, आनंदाने आम्ही जत्रा फिरतो. अशी ही जत्रा आनंदाने आणि उत्साहाने संपन्न होते.
समाप्त।
मित्रांनो तुमच्याकडे जत्रा कशा प्रकारे असते आणि त्या यात्रेमध्ये तुम्ही काय करतात आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा.
तसेच हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९वी आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच मी पाहिलेली जत्रा हा मराठी निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.
मित्रांनो मी पाहिलेली जत्रा हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला, तसेच जर तुम्हाला कोणत्या इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हाला खाली कमेंट करुन सांगा.
धन्यवाद।
2 टिप्पण्या
Vihnhhvjb
उत्तर द्याहटवा?
हटवा