Pustakache manogat essay in Marathi | पुस्तकाचे मनोगत निबंध.

नमस्कार मित्रांनो पुस्तके आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि आज आम्ही पुस्तकाचे मनोगत या विषयावर मराठी निबंध आणला आहे, हे पुस्तकाचे आत्मवृत्त तुम्ही नक्की वाचा.

This image is of book used for biography of book

पुस्तकाचे मनोगत.

मला पुस्तके वाचायला खूप आवडतात म्हणूनच माझ्याकडे वेगळ्या प्रकारची खूप सारी पुस्तके आहेत आणि ती पुस्तकं मी अधून-मधून वाजत राहतो.

माझी पुस्तके इथे तिथे पसरली असल्याने आई मला ती पुस्तके नीट एका ठिकाणी रचून ठेवायला नेहमी सांगत असेते, म्हणून मी एक दिवशी सर्व पुस्तके नीट रचून ठेवण्याचा निर्णय घेतला.

मी माझी सर्व पुस्तके एकत्र केली आणि त्यांना नीट साफ करून एक-एक करून रचू लागला तितक्यात माझ्या हाती माझे एक आवडते पुस्तक लागले, त्या पुस्तकाची दूरदर्शन खूप वाईट झाली होती. पुस्तकाची सर्व पाने निघू लागली होती. मी ते पुस्तक नीट करू लागला आणि तेव्हा मला वाटले जसे की पुस्तकाचे पाने फडफडून माझ्याशी काही बोलायचा प्रयत्न करत आहेत.

मी लक्ष देऊन ऐकू लागला ते पुस्तक काय बोलत आहे, तेव्हा माझ्या लक्षात आले की ते पुस्तक माझ्या वरती नाराज आहे कारण मी त्याची अवस्था खूप वाईट केली होती.

ते पुस्तक बोलु लागले माझा जन्म एका कारखान्यांमध्ये झाला जीथे माझ्या पांढऱ्याशुभ्र पानांवरती विविध महान भारतीयांचा इतिहास लिहला गेला, मला या गोष्टीचा खूप अभिमान होता आणि आता माझ्या जीवनाचे सार्थक होईल असे मला वाटले.

त्या कारखान्यातून मला थेट एका पुस्तकालया मध्ये पाठवण्यात आले मला वाटले होते आता माझ्या मधला इतिहास वाचण्यासाठी लोक माझ्याकडे धावत येतील, पण असे काही झाले नाही. लोकांना माझ्यामधील असलेल्या रोमांचक इतिहासा मध्ये काहीच रुची नव्हती. मग काय मी तसेच त्या पुस्तकालयात धूळ खात पडून राहिले होते. आणि मी वाट पाहत होते कधी कोणी येईल आणि माझा उपयोग करून घेईल.

मग शेवटी जेव्हा मला वाटू लागले कोणालाही माझ्या मधे रुची नाही अश्या वेळीस तू त्या पुस्तकालयात माझा शोध घेत आला, मला तेव्हा खूप आनंद झाला तू मला घरी आणले आणि माझ्या मध्ये असलेल्या इतिहासाचा आनंद घेऊ लागला. तू माझ्या मध्ये इतका गुतला होता की तुला मला वाचताना दुसरे काहीही भान राहत नव्हते.

मग काही दिवसांनी मला तू परत त्या पुस्तकालयात घेऊन गेला मला वाटले आता मला परत तिथे धूळखात राहावे लागेल पण तसे झाले नाही, तू मला विकत घेतले आणि मला घरी घेऊन आला तेव्हा मला खूप आनंद झाला होता कारण मला योग्य मालक भेटला असे मला वाटले होते.

मला तू काही दिवसापर्यंत वाचल नंतर मला तू एका टेबलावर ठेवले तिथे असलेले पाणी माझ्यावर पडले आणि मी पूर्णपणे भिजून गेले होते पण तुझं माझ्यावर लक्ष सुद्धा गेले नाही. मग आईने घरात झाडू मारताना मला उचलून कपटावर ठेवले आणि तेव्हा पासून आज पर्यंत मी तिथेच धुळी मधे पडून होते.

मला खूप वाईट वाटत होते इतक्या दिवस तिथे पडून-पडून माझी पाने निघू लागली होती मला वाटले आता माझे काही खरे नाही आणि आज तू मला परत हातात घेतले. पुस्तकाला गुरु ची महती दिली आहे म्हणून तर म्हणतात "ग्रंथ हेच गुरु". तुम्ही तुमच्या गुरु चा किती आदर करतात म तुम्ही आम्हा पुस्तकांचा आदर का करत नाही. आम्हाला सुधा भावना असतात आमच्या सोबत असा दुर्व्यवहार करू नका रे!. तितक्यात हवेने पुस्तकाची पाने पुन्हा फडफडले आणि मी निश्चय केला आज पासून मी माझ्या सर्व पुस्तकांचे योग्य काळजी घेईन.

समाप्त.

मित्रांनो तुम्हाला पुस्तके वाचायला आवडते का ?, आणि तुमचे आवडते पुस्तक कोणते आम्हाला खाली comment करुन सांगा.

पुस्तकाचे मनोगत हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९ आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतात. तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरला जाऊ शकतो.

  • पुस्तकाची आत्मकथा.
  • फाटक्या पुस्तकाचे मनोगत.
  • पुस्तकाचे आत्मवृत्त.

मित्रांनो तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आणि जर आपल्याला कोणत्या इतर मराठी विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला खाली comment करुन सांगा.

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या